Tuesday, March 31, 2015

कधी कधी



कधी कधी मन माझे
वाऱ्यावरती स्वैर डोलते
कधी कधी हळूच ते
एकांतातही झुरते

स्वार्थाची जोड त्याला
कधी कधीच जडते
इतरांना कमी लेखून
स्वतःस पुढे सारते

कधी कधी नयन हे
शोध कुणाचातरी घेती
आठवण येता त्याची/तिची
नकळत हलकेच मिटती

हास्य मुखड्यावरचे
ओसंडून मग वाहते
नकळत गालावरच्या
खळीत हलकेच विरते

प्रेमाच्या त्या स्पर्षाची
कधीकधीच संधी मिळते
आलिंगनात गढून जाऊन
अस्तित्वाचे भान तुटते

स्वानंद नंदकुमार मराठे 
२०/०८/२०१४
१३:४५ वा.

No comments:

Post a Comment