Saturday, March 28, 2015

आज तुझी खुप आठवण आली......

त्या इवल्याशा कळीला बघुन
त्या रांगणाऱ्या बाळाला बघुन
रंगीत फुलपाखराला बघुन
आज तुझी खुप आठवण आली

लहान होतीस अगदी जेव्हा
कडेवर निजयचीस
धावत धावत यायचीस
कुशीत झोपुन जायचीस

माखलेले हात, लुटपुटणारे पाय
तरी खेळायचा हट्ट करायचीस
खेळणी घेऊन बसायचीस
मला ही खेळायला लावयचीस

भूक लागली की घरभर एकच दंगा
दोन घास खाऊन उठून पळायचीस
टेबल खाली लपून बसायचीस
मग चॉकलेट साठी हट्ट करायचीस

विसरू नको कधी या घराला
तुझे आई बाबा राहतात इथे
तुझी गरज आहे आज तिथे
लहानाची मोठी झालीस जिथे

ती लग्नाची वरात बघुन
त्या रडवेल्या मुलीला बघुन
तिच्या आई बापाचे चेहरे पाहून
खरच बाळा.... आज तुझी खुप आठवण आली
- Amruta Gokhale

No comments:

Post a Comment