Saturday, March 28, 2015

:-(

कंटाळलो या भू वर आता,
उतूंग स्वप्ने लादली जाता,
कसा चढावा पर्वत आता,
उरल्यात त्या शेवटच्या श्वासा.

आता रोजचं चालतात तेच ते खेळ
कसे जुळायचे जिवाचे मेळ
संसार चक्र म्हणजे जणू जीवणाची भेळ.

आता वाटत मुक्त उडाव,
रस्ता नेईल तीथवर पळाव
पुन्हा एकदा लहान बनाव.

बडबड गीतांची चाहुल लागली
फुलपाखरां प्रती प्रीत उमलली
भीर भीर नाय्रा रंग छटांची मनात एक हुरहुर उठली.

वाटत कधी व्हाव झुळूक वाय्राची
मुक्त विहारणाय्रा मस्त तर्हेची
फुलातल्या त्या मकरंदाची
लोकविलक्शन अशा चाफ्याची.

झाला असा विचार पक्का
तेवढ्यात कुणीतरी ओरडला
युवराज ने लगावला छका
शुद्ध आली अलो भानावरती
शेवटी धरीनी खाली आणि आकाशच वरती.
-सौरभ घनश्याम कावळे.

No comments:

Post a Comment