Wednesday, January 4, 2017

मला ती पहिल्यांदा पाहिली तेव्हाच आवडली. पण माणसाचं मन चंचल. रोज कोणावर तरी क्रश येतो. साला रोजच कोणीतरी आवडायचं. बऱ्याच दिवसांनी परत एकदा दिसली. परत आवडली. अजून नव्याने. असं करत करत मी तिच्याकडे लक्ष देऊ लागलो. कधी नकळतपणे, कधी आपणहून. जसे जसे दिवस जात गेले, तसतशी मला ती अजूनच आवडायला लागली. हाही आकर्षणाचाच एक भाग होता असं म्हणायला हरकत नाही. मग मी डोक्यात गाळणी घेऊन बसलो. आणि शेवटी तीच उरली. तेव्हापासून तीच आहे. तिच्यानंतरही अजून बऱ्याच आल्या गेल्या, पण तिची जागा कोणी घेऊ शकलं नाही. तिची ती जागा आजही हृदयात तशीच आहे. ध्रुवताऱ्यासारखी.

#साजणी
#माझाचंद्र

Tuesday, February 23, 2016

एक अनोळखी तू



एक अनोळखी तू
बहीण बनून गेलीस
तुटलेले मन माझे
सावरून गेलीस

बंध म्हण अथवा
मनातली आपुलकी
रामाची इच्छा किंवा
भावाची बांधीलकी

भेट आपली आठव पहिली
कसे होते सारे जमले
नाते सुरु झाले तेव्हा
आपण झालो आपले

पाठिंबा हवा या भावाला
देशील ना ताई सांग
मी ही धावून येईन तुजसाठी
हाक मारशीलना सांग

आयुष्यभर जपेन मी
आपुल्या या नात्याला
बहिणाबाई माझ्या तुम्ही
विसरु नका भावाला

स्वानंद नंदकुमार मराठे
22/02/2016
12:08 वा.
( कर्वेनगर - पुणे )

girikand ofc bhandarkar road- pune



Gadiche te lightahi
Magomag palat hote
Hornchya tya aavajane
Hrudayahi ghabrat hote

Salsalnare pan suddha
Jaminivar padat hote
Vijechya taranmadhuni
Thingi houn padat hote

Chandrachya tya dokavnyane
Manahi algad sukhavat hote
Aathvan yeta tuzi sakhe
Dolehi bharun yet hote

Tu yet navhtis matra
Mi tuzich vat pahat hoto
Akashatlya chandanyana
Sath tyanchi magat hoto

Swanand nandkumar marathe
19/02/2016
19:14 vaa.
( girikand ofc bhandarkar road- pune)

येता तू चालत अशी



येता तू चालत अशी
लाडीक मजकडे पाहुनी
टाकला कटाक्ष मी ही
तुझ्या त्या नयनी

दुःख क्षणभर विसरुन गेलो
तुला सामोरी बघुनी
जीव गुंतु लागला तुझ्यात
जणू अर्थ लाभला जीवनी

थरथरत्या अधरांची मोहक
हालचाल गेलीस करुनी
घायाळ झाली काया
तुझ्या कवेत जाऊनी

पाहू लागलो आनंदास
तुझ्या त्या कवेतुनी
अचानक अदृष्य झालीस
माझ्या तू समोरुनी

भास होता बहुधा माझा
अलगद गेला विरुनी
क्षणात येऊन गेलीस
स्पर्षाची लाली चढवुनी

पुन्हा दिसलीस अचानक
हात दाखवताना दुरुनी
तुजकडे येऊ पाहत होतो
परी पाय सोडिना धरणी

पाऊसही बरसू लागला
तुही गेलीस भिजुनी
दुःखही आता अलगद
गेले अश्रुवाटे वाहुनी

स्वानंद नंदकुमार मराठे
04/02/2016
20:30 वा.
( कर्वेनगर पुणे )