Sunday, May 10, 2015

आई

आई आई हाक मारत
यायचो शाळेतून घरी
भूक लागली असेल म्हणून
तयारीत असायची तीही

भांडलो कोणाशी कधी
तर रागाने मारायची
उन्हातून फिरताना मात्र
मायेची सावली द्यायची

मोठे झालो आपण आता
आई थोडी दुरावली
मायेने जवळ करणारी ती
घरातूनच नाहीशी होऊ लागली

आठवण खूप येत्ये तिची
मी दूर आहे तिजपासून
अश्रूही थांबत नाहीत
तिला आठवून आठवून

गरज आहे तिची
या क्षणीही मला
अश्रू पडून पडून
झाला कागदही ओला

स्वानंद नंदकुमार मराठे
११/०५/२०१४

१८:३५ वा.

Tuesday, May 5, 2015

मराठी अस्मिता...

शहापूरच्या भूमीत चमत्कार घडतोय
राजांच्या नजरेखाली आमच्यातला प्रत्येकजण वाढतोय

माहुली गर्जनेचा घुमतोय नाद
शहापूरकरांनी दिली  प्रेमळ साद

शहापुरातील मनाच पाहिलं पथक सजतय,
आणि त्यांचंच नाव आता सगळीकडे गाजतंय

पहिल्याच  दिवशी दिली जगदंबेला सलामी,
इथे कोणालाच पटत नाही कोणाची  गुलामी

दुसरा मुजरा तो शिवछत्रपतीला,
कोणी रोखू शकत नाही माहुली गर्जनेच्या गतीला

Facebook, what';s app वर सगळीकडे गाजतोय,
इतका असूनही सामाजिक बांधिलकी जपतोय

आमचे सगळेच वादक आमची शान आहे, जबाबदारीसाठी अर्पण प्रत्येकाचाच प्राण आहे...

प्रेमाने बांधलेलं एक कुटुंब,
सार्यांच्या मुखी जगदंब जगदंब

महाराष्ट्र  दिनी ढोल ताशा वाजवला,
माहुली गर्जनेने शहापूर गाजवला

नुसताच गरजणार नाही तर बरसणार पण आहे,
आणि मराठी  अस्मिता जपणार पण आहे 



© Nil ( स्वप्नील घुगे)

Saturday, May 2, 2015

आठवणींचा पाउस

किनाऱ्यावर बसून होतो
वाट तुझीच पाहत गं
वाराही हसत होता
पाहुनी माझी अवस्था गं ll १ ll

नव्हतीस तू सवे माझ्या
लाटाही तेच सांगत होत्या
गाज ऐकुनी मनमोहक तो
आठवणी त्या दाटत होत्या ll २ ll

वाळूवरची अक्षरेही
सुंदर दिसत होती
सागराच्या पाण्यासवे
मिटूनही जात होती ll ३ ll

उदासवाणा चेहरा करून
बसून होतो दगडावर
कसा आहेस शब्द ऐकताच
पटकन आलो भानावर ll ४ ll

आवाज तुझाच होता तो
कानी पडलेला माझ्या
परी दिसत नव्हतीस कुठेही
होते नयन वाटेकडे तुझ्या ll ५ ll

पुन्हा साद ऐकू आली
पुन्हा तेच घडले
विचार आले दाटुनी
मन कावरेबावरे झाले ll ६ ll

उडणाऱ्या त्या घरीसम
मन माझे उडत होते
आकाशातुनी फिरतानाही
वेडे तुलाच शोधात होते ll ७ ll

दिसत नव्हतीस तू तरी
भास तुझाच होत होता
आठवणींचा पाऊस वेडा
सागरावरही कोसळत होता ll ८ ll

                           स्वानंद नंदकुमार मराठे
                           १७/०१/२०१४

                           १४:०७ वा.

Yaadein Mere Dosto ki...


Clg k wo din bhi kitne haseen the
Kabhi hasi to kabhi gile shikve the
Na jane kab aur kaise ye dost ban gaye
Clg k baad dher sari yaade de gaye

Maza ata tha ek dusre ko chidhane me
Fir zagda kar k beshumar galiya dene me
Bhule nai share kiya hua harr 1sip cold drink ka
Canteen k bahar bitaya hua harr lamha masti ka

Kisi din party k liye plan banana
Fir hostel pe last minute pe pohochna
Raat ko room me masti karna
Subah fir clg k liye jaldi bhagna

Lectures ki nind aaj bhi yaad hai
Practical ki mehnat jaise aaj barbaad hai
Padhai to bass ek bahana tha
Clg to roz dosto se mile jana tha

Kuch bhi nai badla inn 4 saalo me
Bass dosti aur bhi gehri ho gayi
Nikal pade sab apne apne rasto pe
Aur wo khushiya bhi rasto me kahi kho gayi

Aaj Clg bhi wahi hai
Canteen bhi wahi hai
Classrooms bhi wahi hai
Bass dost ab milte nai
Dil me unki yaadein par ab bhi zinda hai....