Saturday, March 28, 2015

:-O

भाऊ वरच्याचा त ज्याले त्याले धाक हाय,
दुसय्राच खाण बी पाप हाय,
तरी बी आमच्या गरिबाच्या पोटात आग हाय.

ज्याले पुसाव त्याले आमची जाग हाय,
मोबाईल फोन च जेवण वर पँकेज चा झाग हाय,
सर्व काही कस साफ हाय,
तरी भाऊ आमच्या गरिबाच्या पोटात आग हाय.

आज शिकाले शाळा अन खिचडी भात हाय,
पर पोराले वर धाडलं त लात हाय,
खर  खोट याच गणित बाद हाय,
तरीच भाऊ आमच्या गरिबाच्या पोटात आग हाय.

झाले जरी डोळे लाल तरी बी त्यात गडद अंधारली रात हाय,
नश्वर जगणं त्यावर कधी काळी मिठ भात हाय,
तरीच भाऊ आमच्या गरिबाच्या पोटात आग हाय.

आली जर कधी भाकरी वाट्याले तर तीचे चार भाग हाय,
एक धन्याले, दुसरा त्याच्या परिवाराले, तीसरा त्याच्या कुत्र्याले, अन उरलाच जर तर आम्हाले,
हा असा साधा-सुधा त्याग हाय,
म्हणूनच आम्हा गरिबाच्या पोटात आग हाय.
-सौरभ घनश्याम कावळे.

No comments:

Post a Comment