Monday, March 30, 2015

थेंब


थेंब ते टपोरे
खुणावती आज मला
घेऊन ये तो विश्वास
दिलेला मी तुला...

वाहून जाणार आज मी
सांगितले त्याने मला
अचंबित होऊनी मीच
कारण पुसले मला...

थेंबासम आपले जीवन
असेच वाहून जाणार
नकळत झालेल्या चुकीने
आयुष्य पार बदलणार...

आसरा घेऊन त्या पर्णाचा
टिकून राहिला आहे
तो थेंब पहा कसा
हळुवार खुणावत आहे...

आयुष्याच्या वाटेलाही
अशीच साथ लाभणार
वाऱ्यावरती थिरकत
तो थेंबही आता विरणार...

स्वानंद नंदकुमार मराठे
१८/०३/२०१५
२०:०७ वा.

No comments:

Post a Comment