Saturday, March 28, 2015

जास्वंदीच पान

हिरवगार लुसलुसीत, कोवळ इवलस छान,
गर्दीत कुठतरी लपलेल, मजबूत फांदीवर डोलणार जास्वंदीच पान.

हवेच्या झोतावर डुलणार, वाय्रा संगे नाचणार, ते किती लहान,
अलोट अशा दाट्टीत थोडस फिकट जास्वंदीच पान.

मानाला खुनावणार, डोळ्यांना सुखावणार,
नवनिर्माणाच प्राण,
सुर्य प्रकाशात चकाकणार निर्मळ सुंदर जास्वंदीच पान.

मदमस्त झुलणार, नव चैतन्यानी बहरणार, ते जणू वृक्षाची शान,
थोडस लाजर, मधेच शाहरणार जास्वंदीच पान.

ना उद्याची चिंता, ना कसल तान,
लोभस रुप वर देखणा वान,
बेफिकीर, उन्हाळ जास्वंदीच पान.

माणसास माणुसकी अन प्रेम सांगणार, ते छोट तरी महान,
धुक्यात कुठेतरी गडप झालेल जास्वंदीच पान.

-सौरभ घनश्याम कावळे

No comments:

Post a Comment