Monday, April 27, 2015

धागे

आयुष्यातील धाग्यांनाही
कुठेतरी गुंतवाव लागतं
मनात घर केलेल्याला
कधीतरी विसरावं लागतं

कुठून सुरवात झाली
गुंफण्या त्या धाग्याला
कुणालाच ठावूक नसते
कोण मिळणार साथीला

ती साथ कधी सुटेल
माहित नाही कोणाला
दूर जाणार माहित असूनही
जपतो आपण प्रत्येकाला

तरीही हे धागे आपण
नकळतपणे गुंफत राहतो
फाटलेल्या कापडाला
रफू करत बसतो

आजची ओळख आपली
उद्या कदाचित संपून जाते
गुंफलेल्या धाग्यांचे मग
प्रत्येकाला दुःख होते...

स्वानंद नंदकुमार मराठे
२६/०४/२०१५
०७:०८ वा...

1 comment: