Sunday, May 10, 2015

आई

आई आई हाक मारत
यायचो शाळेतून घरी
भूक लागली असेल म्हणून
तयारीत असायची तीही

भांडलो कोणाशी कधी
तर रागाने मारायची
उन्हातून फिरताना मात्र
मायेची सावली द्यायची

मोठे झालो आपण आता
आई थोडी दुरावली
मायेने जवळ करणारी ती
घरातूनच नाहीशी होऊ लागली

आठवण खूप येत्ये तिची
मी दूर आहे तिजपासून
अश्रूही थांबत नाहीत
तिला आठवून आठवून

गरज आहे तिची
या क्षणीही मला
अश्रू पडून पडून
झाला कागदही ओला

स्वानंद नंदकुमार मराठे
११/०५/२०१४

१८:३५ वा.

No comments:

Post a Comment