Saturday, May 2, 2015

आठवणींचा पाउस

किनाऱ्यावर बसून होतो
वाट तुझीच पाहत गं
वाराही हसत होता
पाहुनी माझी अवस्था गं ll १ ll

नव्हतीस तू सवे माझ्या
लाटाही तेच सांगत होत्या
गाज ऐकुनी मनमोहक तो
आठवणी त्या दाटत होत्या ll २ ll

वाळूवरची अक्षरेही
सुंदर दिसत होती
सागराच्या पाण्यासवे
मिटूनही जात होती ll ३ ll

उदासवाणा चेहरा करून
बसून होतो दगडावर
कसा आहेस शब्द ऐकताच
पटकन आलो भानावर ll ४ ll

आवाज तुझाच होता तो
कानी पडलेला माझ्या
परी दिसत नव्हतीस कुठेही
होते नयन वाटेकडे तुझ्या ll ५ ll

पुन्हा साद ऐकू आली
पुन्हा तेच घडले
विचार आले दाटुनी
मन कावरेबावरे झाले ll ६ ll

उडणाऱ्या त्या घरीसम
मन माझे उडत होते
आकाशातुनी फिरतानाही
वेडे तुलाच शोधात होते ll ७ ll

दिसत नव्हतीस तू तरी
भास तुझाच होत होता
आठवणींचा पाऊस वेडा
सागरावरही कोसळत होता ll ८ ll

                           स्वानंद नंदकुमार मराठे
                           १७/०१/२०१४

                           १४:०७ वा.

No comments:

Post a Comment